सोनू निगमने ट्विट केलेल्या व्हिडिओमुळे नवा वाद?

 Versova
सोनू निगमने ट्विट केलेल्या व्हिडिओमुळे नवा वाद?
Versova, Mumbai  -  

मशिदीवरच्या भोंग्यावरून होणाऱ्या ‘अजान’बद्दल केलेल्या ट्विटमुळे प्रसिद्ध गायक सोनू निगम वादात अडकला आहे. या ट्विटनंतर काही लोक त्याच्या बाजूने उभे राहिले, तर काही त्याच्या विरोधात गेले. पण आता त्याने ‘अजान’चा एक व्हिडिओ देखील अपलोड केला आहे. रविवार सकाळी सोनूने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत ‘गुड मोर्निंग इंडिया’ असं ट्विट केलं आहे.

सोनू निगमने रविवारी पहाटे पाचच्या सुमारास हा व्हिडिओ रेकॉर्ड करून ट्विटरवर अपलोड केला. या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत अजानचा आवाज ऐकायला येत आहे. हा व्हि़डिओ पोस्ट करत सोनूने आणखी एक ट्विट देखील केलं. यामध्ये त्याने म्हटलंय, 'लोकांना झोपेतून जागे करण्यासाठी आपण आपल्या डोक्यावरील केस कापले.' सोनूने टाकलेल्या या नव्या ट्विटमुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी सोनू निगमने मशिदीवरील भोंग्यावरून होणाऱ्या आजानबाबत आक्षेप नोंदवत ट्विट केलं होतं, 'मी मुस्लिम नसतानाही अजानमुळे रोज सकाळी लवकर उठावं लागतं. सक्तीची धार्मिकता थांबणार कधी? असा प्रश्न देखील त्याने उपस्थित केला होता.

Loading Comments