Advertisement

स्पेशल ओप्स १.५ सीरिज प्रदर्शित, विकेंडला अनुभवा थरार

स्पेशल ओप्सचा Special Ops 1.5 हा नवा सीझन प्रदर्शित झाला आहे.

स्पेशल ओप्स १.५ सीरिज प्रदर्शित, विकेंडला अनुभवा थरार
SHARES

सध्या ओटीटी प्लॅटफोर्मवरील विविध विषयांवरील वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. त्यापैकीच एक सीरिज म्हणजे स्पेशल ओप्स.  स्पेशल ओप्स या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली होती.

आता प्रेक्षकांना याचा दुसरा सीजन पाहायला मिळणार आहे. स्पेशल ओप्सचा Special Ops 1.5 हा नवा सीझन प्रदर्शित झाला आहे. यामध्ये देखील के.के.मेनन यांची भूमिका पाहायला मिळणार आहे.

के के मेनन यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'स्पेशल ऑप्स 1.5: द हिम्मत स्टोरी' या वेब सीरिजबद्दल सांगितलं होतं. पोस्टमध्ये त्यांनी लिहीलं होतं की, 'नेहमी ऑन ड्युटी असणाऱ्या सर्व वीरांना सलाम! स्पेशल ओप्स 1.5 चे सर्व एपिसोड डिझनी प्लस हॉस्टावर १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.'

पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल के के मेनन यांनी सांगितले होते, 'पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. मी सर्वांचे आभार मानतो. '

स्पेशल ऑप्स 1.5 मध्ये के के मेनन हे १५ वर्षाच्या मुलाची भूमिका साकारणार आहेत. या सिझनमध्ये हिम्मत सिंह हा रॉ एजंट कसा झाला हे दाखवण्यात येणार आहे.

स्पेशल ओप्सच्या पहिल्या सिझनमध्ये करण टॅकर, सना खान, दिव्या दत्ता, सय्यामी खेर, विनय पाठक या कलाकारांनी प्रमुख महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

तर दुसऱ्या सिझनमध्ये आफताब शिवदासानी, आदिल खान, गौतमी कपूर, परमीत सेठी आणि विजय विक्रम सिंग हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नीरज पांडे आणि शिवम नायर यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.



हेही वाचा

छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार गाजणार

नेटफ्लिक्सवरील 'Squid Game' का ठरतोय लोकप्रियं?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा