Advertisement

छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार गाजणार

‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार गाजणार
SHARES

‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटातून छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे.

 हा चित्रपट मराठी आणि इंग्रजी भाषेत चित्रित होणारा असून हा जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट असल्याचे जाहीर करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिका साकारणार आहे.

छत्रपती महाराणी ताराबाई भोसले... मुघलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री होत्या. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असणाऱ्या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली.

मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरूद्ध त्यांनी निकराचा लढा दिला. त्या एक उत्तम राजकारणी, व्यवस्थापिका तर होत्याच याव्यतिरिक्त एक आदर्श सून, पत्नी आणि माता या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. अशा या रणरागिणीची शौर्यगाथा या चित्रपटात मांडण्यात येणार आहे.

‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशियो फिल्म्स’ यांच्या प्रयत्नातून युनायटेड किंगडम मधील नावाजलेली ‘ब्लॅक हँगर स्टुडिओ ‘ आणि ‘ओरवो स्टुडिओ’ ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करत आहेत. चित्रीकरण आणि तांत्रिक बाबी देखील लंडनमध्येच होणारा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे.

या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कदम यांचे असून राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट २०२२ च्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हेही वाचा

पुनीत राजकुमारच्या नेत्रदानामुळे उजळले ४ जणांचे आयुष्य

जगभरात धुमाकूळ घालणारा बाहुबली लवकरच मराठीत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा