शाहरुखचा असाही एक चाहता


  • शाहरुखचा असाही एक चाहता
  • शाहरुखचा असाही एक चाहता
SHARE

मुंबई - शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'रईस'ची प्रदर्शनापूर्वी जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमातील सगळीच गाणी आणि ट्रेलर दर्शकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. शाहरुखचा चाहता आणि मुंबईच्या उपनगरात बुटांचं दुकान चालवणारे चर्मकार शाम बहादूर यांना 'रईस' सिनेमातला ‘कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता' हा डायलॉग इतका आवडला की त्यांनी ते पाटीवर लिहून चक्क ती पाटी दुकानाच्या बाहेर लावली. याबद्दल समजताच शाहरुखने शाम बहादूरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मुंबईतील एका स्टुडिओमध्ये मुलाखतीदरम्यान शाहरुखने शाम बहादुरलाही बोलावले. या वेळी शाहरुखने शाम बहादुरची गळाभेट घेतली, तेव्हा शामने शाहरुखला बुटांची जोडी भेट म्हणून दिली. जे त्याने स्वत: तयार केले होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या