मुकाभिनयकार मार्सोंच्या आठवणींना उजाळा

 Dadar
मुकाभिनयकार मार्सोंच्या आठवणींना उजाळा
मुकाभिनयकार मार्सोंच्या आठवणींना उजाळा
मुकाभिनयकार मार्सोंच्या आठवणींना उजाळा
मुकाभिनयकार मार्सोंच्या आठवणींना उजाळा
मुकाभिनयकार मार्सोंच्या आठवणींना उजाळा
See all

दादर - मूक अभिनय कलाकार मार्शल मार्सो यांच्या स्मृतिदिनानिमित्त दादर-माटुंगा सांस्कृतिक कला केंद्रात गुरुवारी आर्ट ऑफ सायलन्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रुईया, पोद्दार, सोमय्या, केळकर या सहा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.

या कार्यक्रमाचे आयोजन कृणाल पाटील, गुरुराज वडके, विनायक सैद, कुणाल मोतलिंग यांनी केले होते. यावेळी एका चित्रफितीच्या माध्यमातून मार्शल यांच्या शिष्या जॅनेट यांनी आपले अनुभव आणि भावना प्रेक्षकांसमोर मांडल्या. या कार्यक्रमाला मराठी कलाकार मकरंद देशपांडे, मार्शल मार्सो यांचे शिष्य बापी दास, कथक नृत्यांगणा सोनिया परचुरे या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

Loading Comments