सुखविंदर सिंगही मराठी सिनेमांच्या प्रेमात

 Trombay
सुखविंदर सिंगही मराठी सिनेमांच्या प्रेमात

ट्रॉम्बे - मराठी सिनेमाने सातासमुद्रापार आपली वेगळी अशी ओळख बनवली आहे. आता हिंदी कलाकारही मराठी सिनेमांचं कौतुक करू लागले आहेत. फक्त कौतुकच नाही, तर मराठी सिनेसृष्टीत कामही करू लागलेत. रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा, अगदी सलमान खान असे अनेक बॉलिवूड स्टार मराठी सिनेमांच्या प्रेमात पडलेत.

आता या यादीत अजून एक नाव सामील झालंय. लवकरच प्रदर्शित होणारा मराठी सिनेमा 'राजा'मध्ये आपल्या गायकीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केलेला गायक सुखविंदर सिंग आपल्याला मराठी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

सुखविंदर सिंग यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याने नुकताच 'राजा' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त ट्रॉम्बे येथील एस्सेल स्टुडिओत उत्साहात संपन्न झाला. प्रवीण काकड यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सहनिर्मिती नरेश साखरे यांची आहे. पॉप सिंगरच्या आयुष्यावर राजाची कथा बेतली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून संवाद मिलिंद इनामदार आणि शशिकांत देशपांडे यांनी लिहिले आहेत.

वलय मुळगुंद यांच्या लेखणीने सजलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. सौरदीप कुमार, स्वरदा जोशी, निशिता पुरंदरे, शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, पौरस देशपांडे आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत.

Loading Comments