सुशांत आणि क्रितीच्या 'राबता'चा पोस्टर प्रदर्शित

 Mumbai
सुशांत आणि क्रितीच्या 'राबता'चा पोस्टर प्रदर्शित
Mumbai  -  

सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'राबता' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला. पोस्टरवर क्रिती आणि सुशांतची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तसेच पोस्टरवर 'एव्हरिथिंग इज कनेक्टेड' ही टॅगलाईन पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुकता आहे.

होमी अदजानिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिनेश विजन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'एम एस धोनी' या चित्रपटात सुशांतने साकारलेली धोनीची भूमिका कौतुकास्पद ठरली. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अधिक अपेक्षा आहेत. या चित्रपटाचा एक व्हिडिओ ही ट्विटरवर 'राबता' चित्रपटाच्या ऑफिशियल पेजवर शेअर करण्यात आलाय. यात क्रिती सेनॉन आणि सुशांत सिंग राजपूत यांनी पझलच्या मदतीने 'राबता' चित्रपटाचा पोस्टर बनवला आहे.

सुशांत सिंग राजपूत क्रिती सेनॉनला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांना अनेक वेळा एकत्रही पाहिले गेले आहे. 'राबता' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ आल्याची चर्चा सुरू आहे.

Loading Comments