Advertisement

'संभाजी'च्या सेटवर सामाजिक शिवजयंती


'संभाजी'च्या सेटवर सामाजिक शिवजयंती
SHARES

प्रत्येक ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. असं असताना स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या सेटवर शिवजयंती साजरी झाली नाही, हे होणं अशक्यच. शिवजयंतीच्या निमित्ताने संभाजी मालिकेच्या सेटवर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सामाजिक कार्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला.

विशाल परुळेकर आणि त्यांच्या ‘साई आधार’ या संस्थेने सामाजिक कार्याचा वसा हाती घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या पालन-पोषणाची आणि शिक्षणाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. विशाल परुळेकर यांच्या या कार्याला पाठिंबा देत त्यांचा गौरव करण्यासाठी ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर नुकतेच त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी विशाल सांभाळ करीत असलेले विद्यार्थी सेटवर उपस्थित होते. या सगळ्यांबरोबर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत संभाजी मालिकेतील कलाकारांनी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या.

विशाल परुळेकर यांचं कार्य खूप मोलाचे असून ते सर्वांपुढे आणत त्यांच्या कार्याला सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला आहे. या संस्थेला मी आर्थिक मदत सुद्धा केली आहे.

- डॉ. अमोल कोल्हे, अभिनेता

या मालिकेतील येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड तसेच धाराऊ म्हणजे लतिका सावंत आणि पुतळाबाई म्हणजे पल्लवी वैद्य यांनी उपस्थित विद्यार्थी आणि विशाल परुळेकर यांचे औक्षण केले. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवराय, जिजाऊ आणि संभाजी महाराज यांचे स्मरण करत पोवाडा आणि गाणी या मुलांनी सादर केली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा