श्यामच्या आईची उत्तुंग भरारी

 Mahim Railway Station
श्यामच्या आईची उत्तुंग भरारी

माहिम - श्यामची आई या एकांकिकेनं विघ्नहर्ता करंडक पाठोपाठ उत्तुंग एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ओवी या सायकोथ्रिलर एकांकिकेला दुसरा तर बोन्साई एकांकिकेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. सिडनॅहम महाविद्यालयाच्या श्यामची आई या एकांकिकेतील स्वप्नील जाधव याला सर्वोत्कृष्ट लेखनासाठी गौरवण्यात आलं. त्याशिवाय सर्वोत्क्रृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्क्रृष्ट अभिनय स्त्री, पुरूष अशी पारितोषिकं पटकावली. ही अंतिम फेरी यशवंत नाट्यगृहात शुक्रवारी पार पडली.

या वेळी सहा एकांकिका सादर करण्यात आल्या. त्यात फोर्थ वॉल ठाणेची रात्रीस खेळ चाले, जागर आर्ट ऑफ नेशनची ग्रीड अँड फिअर, सिडनॅहम महाविद्यालयाची श्यामची आई, मैत्री कलामचं डोंबिवलीची बोन्साइ, झिरो बजेट प्रोडक्शनची ओवी आणि वर्क इन प्रोग्रेसची सर-कस या एकांकिका सादर झाल्या. यंदा या स्पर्धेचं नऊवं वर्ष होतं.

Loading Comments