मुंबईत 'थिएटर ऑन डिमांड’

  Pali Hill
  मुंबईत 'थिएटर ऑन डिमांड’
  मुंबई  -  

  मुंबई - भारतातील सर्वात मोठी चित्रपट प्रदर्शन कंपनी पीव्हीआरने शुक्रवारी 'थिएटर ऑन डिमांड’ (वकाओ) ही सेवा सुरू केली आहे. वकाओ एक असा संयुक्त कृती मंच आहे जिथे कोणत्या सिनेमागृहात कोणता चित्रपट दाखवला जाईल याची माहिती प्रेक्षकांना मिळण्यास मदत होईल.

  भारतात पहिल्यांदाच ‘थिएटर ऑन डिमांड’ या सेवेची सुरुवात झाली आहे. यात सर्व सिनेमागृहात अनेक स्टुडिओ आणि स्वतंत्र चित्रपट कलेक्शन प्रदर्शित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या वेळी पीव्हीआर लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार बिजली, अभिनेता ऋतिक रोशन, अभिनेत्री यामी गौतम, पीव्हीआर पिक्चर्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमल ज्ञानचंदानी उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.