Advertisement

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव 15 डिसेंबरपासून


थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव 15 डिसेंबरपासून
SHARES

दादर - १५ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १५ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते रविंद्र नाट्यमंदिराच्या मिनी थिएटरमध्ये महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा होणार आहे. या वेळी प्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. पुण्याच्या आशय फिल्म क्लबचे संस्थापक सेक्रेटरी सतीश जकातकर यांना सत्यजित राय स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवातंर्गत १६ डिसेंबरपासून दररोज पाच चित्रपट दाखवले जातील. महोत्सवात इराण, नेपाळ, जपान बांगलादेश, कोरिया, व्हिएतनाम, लेबेनॉन इत्यादी देशातील आशयघन चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटाच्या वेगळ्या विभागांतर्गत मराठी चित्रपटांचा आस्वादही महोत्सवात घेता येणार आहे. या महोत्सवाची ऑनलाइन प्रवेशनोंदणी सुरू झाली असून रसिकांना www.affmumbai.org या वेबसाइटवर प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेत. तसंच महोत्सवाचे डेलिगेट रजिस्ट्रेशन काउंटर १० डिसेंबरपासून रविंद्र नाट्यमंदिर इथे दुपारी १ ते ७ वाजेपर्यंत खुले राहणार असून येथेही प्रतिनिधी नोंदणी करता येईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा