Advertisement

'F. U.'चा खरा हिरो होता 'अमित ठाकरे'


'F. U.'चा खरा हिरो होता 'अमित ठाकरे'
SHARES
Advertisement

खुद्द राज ठाकरे यांनीच आपल्या मुलाबाबत एक गौप्यस्फोट केले आहे.'दीड वर्षापूर्वी निर्माता महेश मांजरेकर यांनी मला सांगितले होते की, माझा मुलगा अमितला महेश मांजरेकर हे त्यांच्या सिनेमात लाँच करणार होते, पण तेव्हा त्यांना सिनेमाचे नाव विचारले आणि F. U. हे नाव ऐकल्यावर आपणच नकार दिला, हा सिनेमा नको या वेळी राहू देत आपण पुढच्या वेळी बघू, कारण बाहेर बाप तेच बोलतो आणि मुलगा देखील पहिल्या सिनेमात तेच बोलेल म्हणून यावेळी अमित या सिनेमात नको' असे राज ठाकरे यांनी म्युझिक लाँचच्यावेळी सांगितले होते. यावेळी निर्माते महेश मांजरेकर यांनी 'अमितने सिनेमात काम केले तर, त्याचा पाहिला सिनेमा माझाच असेल' असे वचनही राज ठाकरे यांच्याकडून मागितले.

महेश मांजरेकर यांचा अगामी सिनेमा 'F.U.' ची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या सिनेमात सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर अगदी वेगळ्या आणि स्टायलिश लूकमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा पहिला टीजर आपल्यासमोर आला होता. त्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक भलते उत्सुक दिसत आहेत. 

पण या सिनेमात अभिनेता म्हणून अक्षय ठोसरच्या जागी खरेतर अमित ठाकरे याला घेण्याची मागणी निर्माते महेश मांजरेकर करत होते असे खुद्द राज ठाकरे यांनी F. U. च्या म्युझिक लाँचच्या वेळी सांगितले. 


संबंधित विषय
Advertisement