बाबा आले धावून !

 Bandra west
बाबा आले धावून !
बाबा आले धावून !
See all

मुंबई - उरी हल्ल्यानंतर सलमान खानच्या वक्तव्यावरून सगळीकडूनच राग व्यक्त झाला. अगदी लता मंगेशकरांपासून ते नाना पाटेकर यांच्याकडून हि त्याच्या वक्तव्यावर राग व्यक्त झाला. पण आता ह्या सगळ्या प्रकरणानंतर सलमानचे वडील सलीम खान त्याला वाचवायला आलेत. सलमानचा बचाव किंवा माफी मागून प्रश्न निकालात काढण्याऐवजी सलीम खान यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘टाईम्स नाऊ’ चॅनेलवर निशाणा साधत सलीम खान म्हणाले, “ब्रेकिंग न्यूज टाईम्स नाऊच्या ‘वाँटेड लिस्ट’मध्ये सईद, लख्वी आणि मसूद यांच्या जागी सलमान खान, महेश भट्ट, करण जोहर आणि सीताराम येचुरी यांनी घेतली.. कारण हे लोक आपल्या देशासाठी अत्यंत घातक आहेत.” ह्या आधीही सलमान खान असे वादग्रस्त वक्तव्य करून अडचणीत आला आहे. प्रत्येकवेळी सलीम खान सलमानसाठी माफी मागत आले आहेत, त्याचा बचाव करत आले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी तसं न करता विरोधकांनाच सुनावले आहे.

Loading Comments