Advertisement

थम्स -अपच्या जाहिरातीतून सलमान बाहेर


थम्स -अपच्या जाहिरातीतून सलमान बाहेर
SHARES

मुंबई - कोका-कोला कंपनीचा ब्रॅड असलेल्या थम्स -अपच्या जाहिरातीत सलमान खान आता दिसणार नाहीये. कोका-कोला कंपनीबरोबर त्याचा झालेला करार गेल्या महिन्यात संपला. त्या कराराची मुदत वाढवा असं सांगूनही कंपनीनं करार वाढवला नाही. त्यामुळेच आता सलमान थम्स -अपच्या जाहिरातीत झळकणार नाही. सलमान 4 वर्षापासून कोका- कोला कंपनीचा ब्रॅड अॅम्बेसिडर होता. त्याच्या जागी आता अभिनेता रणवीर सिंह असणार आहे. सलमानला दरवर्षी 5 करोड रुपये कंपनी देत होती. तसंच कोका-कोला कंपनीने ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून ऑक्टोबर 2012 मध्ये अक्षय कुमारला न घेता सलमानला घेतलं होतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा