Advertisement

'तुम बिन' अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला


'तुम बिन' अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

बॉलिवूडमधील प्रख्यात गायक कुमार सानू आणि आघाडीच्या गायिका मधुमिता चॅटर्जी यांनी एकत्रितपणे ‘तुम बिन’ हा नवीन अल्बम तयार केला आहे. प्रख्यात गायक सुरेश वाडकर आणि अनुप जलोटा यांच्या हस्ते या अल्बमचं प्रकाशन झालं. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात हा प्रकाशन समारंभ पार पडला. यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


सात दमदार गाणी

या अल्बममध्ये सात अत्यंत दमदार अशी गाणी आहेत. लॉस एंजलीसचे प्रख्यात बोरा काराकास आणि कोलकाता येथील व्हायब्रेशन स्टुडिओचे गौतम बासू या दोघांनी यशस्वीपणे या अल्बमचं ध्वनिमुद्रण केलं. या अल्बमच्या संगीताचं मिक्सिंग आणि संकलन ‘स्टुडिओ 208’च्या अलोक पुंजनानी यांनी केलं आहे.

या अल्बममधील संजय (बापी) दास यांच्या उत्कृष्ट रचना असून गीटारवादक पार्थ पॉल यांचे वादन यावेळी श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. यातील अनोख्या अशा पाच ट्रॅकची संगीत रचना लॉस एंजलीस येथील समीर चॅटर्जी यांची आहे. इतर दोन ट्रॅक हे राजीब चक्रवर्ती आणि सुवोदीप मुखर्जी यांचे आहेत.


मला खूप आनंद होत आहे की, १९९०च्या दशकातील मधुर संगीताची आम्ही पुनरुक्ती करत आहोत. ‘तुम बिन’च्या माध्यमातून आम्ही उत्तम गीत आणि संगीत घेऊन आलो आहोत. हा अल्बम लोकांना नक्कीच आवडेल, अशी अपेक्षा आहे.

- कुमार सानू, गायक


बॉलिवूड संगीताचा स्तर घसरला असल्याची बऱ्याचजणांची धारणा आहे. चांगले संगीत आणि उत्तम गीतं यांचा अभाव असल्याचं एकूण चित्र आहे. ‘तुम बिन’च्या रूपानं आम्ही भारतीय संगीतातील माधुर्याचा अनुभव परत रसिकांना देत आहोत. यातील गीतं हृदयाला भिडतात तर रचना या गीतांना उत्तुंग पातळीवर घेवून जातात. त्यातून संगीत रसिकांमध्ये संगीताबद्दल एक नवी अाशा निर्माण होईल.

- मधुमिता चॅटर्जी, गायिका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा