बिग बॉस पहिल्या दहातही नाही

 Pali Hill
बिग बॉस पहिल्या दहातही नाही
बिग बॉस पहिल्या दहातही नाही
बिग बॉस पहिल्या दहातही नाही
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - बिग बॉसच्या लोकप्रियतेत चांगलीच घसरण झालीये. गेल्या सात सिझनमध्ये टीआरपीत आघाडीवर राहिलेल्या या मालिकेला या सिझनमध्ये मात्र ते स्थान पटकावता आलेलं नाहीये. बिग बॉस भाईजानपुढे सास-बहू, विविध खलनायिका आणि चक्क नागिननंही तगडं आव्हान उभं केलंय.

नागिन सध्या टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ससुराल सिमर का दहाव्या स्थानावर आहे. पहिल्या ते दहाव्यापैकी कुठल्याही क्रमांकावर बिग बॉसला मात्र जागा मिळू शकलेली नाही. नहीं, नहीं नहीं... असं कितीही ओरडा, बिग बॉस पहिल्या दहात नाही हेच सत्य आहे.

त्यामुळे सलमान खानची लोकप्रियता कमी झालीये की बिग बॉसचं स्वरूप बदलण्याची वेळ आलीये, अशी चर्चा सुरू झाली आहे. बाबा ओमचे कारनामे, लोपा, मोनालिसा, बनीसारख्या मदनिका, हरयाणवी तरुणांचा रगेल-रंगेलपणा या सगळ्या मसाल्यापेक्षा संस्कारी सास-बहू आणि खलनायिका, नागिन यांना प्रेक्षकांची पसंती मिळतेय. बिग बॉसमध्ये होणाऱ्या भांडणांचा इमोशनल अत्याचार सहन करण्यापेक्षा प्रेक्षक अन्य मालिकांकडे वळले आहेत, हे मात्र नक्की.

Loading Comments