• उमेश कामत होणार डॉक्टर!
  • उमेश कामत होणार डॉक्टर!
SHARE

आतापर्यंत बऱ्याच दिगजांचा जीवनप्रवास आपण सिनेमातून पहिला आहे. आणि अशा सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. ‘बायोपिक’ चित्रपटांच्या या यादीत आता जगातील एक प्रमुख स्पाईनल सर्जरी तज्ज्ञ असलेल्या डॉ. प्रेमानंद रामाणी यांचं ही नाव जोडलं जाणार आहे . डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘ताठ कणा The power of imagination’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला.

या सिनेमात डॉक्टर रामाणी यांची भूमिका कोण साकारणार? याची उत्सुकता असतानाच त्यांच्या भूमिकेत अभिनेता उमेश कामत असणार याची घोषणा या वेळी करण्यात आली. पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया करण्यात अतिशय निष्णात अशा जगातील पहिल्या पाच तज्ज्ञांमध्ये डॉ. प्रेमानंद रामाणी यांचे नाव घेतले जाते. अशा माणसाचा जीवन प्रवास आणि तो ही उमेश कामातच्या भूमिकेतून पाहायला मिळणे ही प्रेक्षकांसाठी मेजवानीच ठरेल हे नक्की. विजय मुडशिंगीकर, नीलम मुडशिंगीकर, करुणा पंडित या चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शन दासबाबू करणार आहेत.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या