उमेश कामतचा हॉट लूक !

  Mulund
  उमेश कामतचा हॉट लूक !
  मुंबई  -  

  मुंबई - आतापर्यंत तुम्ही बॉलीवूडमधल्या कलाकारांमध्ये फिटनेस आणि सिक्सपॅकची क्रेझ पाहिली असेल. शाहरुख, सलमान ते अगदी नवखे कलाकार म्हणजेच टायगर श्रॉफ, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा हेही त्याला अपवाद नाहीत. पण आता मराठी कलाकारही यात मागे नाहीत. मराठी अभिनेता उमेश कामतने नुकताच त्याचा नवा लुक ट्विटरवर शेअर केलाय. सिक्स पॅक्स असलेला त्याचा हा हॉट फोटो फोटोग्राफर तेजस नेरुरकरने काढला आहे. उमेशने हा फोटो ट्विटवर शेअर केल्यानंतर लगेच त्याच्या अकाउंटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अगदी सिने इंडस्ट्रीतल्या कलाकारांकडूनही त्याचं कौतुक होऊ लागलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.