Advertisement

ज्येष्ठ अभिनेते टॉम ऑल्टर यांचे निधन


ज्येष्ठ अभिनेते टॉम ऑल्टर यांचे निधन
SHARES

बॉलिवूडसह अनेक टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करणारे आणि लेखक, दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले टॉम अॉल्टर (67) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते मागील अनेक दिवसांपासून त्वचेच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतल्या सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्री उपचारांदम्यान त्यांचे निधन झाले.

अमेरिकन वंशाचे टॉम अॉल्टर यांनी 300 हून अधिन सिनेमांमध्ये अभिनय केला. त्यांनी 1976 मध्ये 'चरस' या सिनेमातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी 'शतरंज', 'गांधी', 'क्रांती', 'खिलाडी' आणि 'वीर झारा' यांसारख्या चित्रपटांत साकारलेल्या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. याचबरोबर त्यांनी 'जबान संभाल के' या टीव्ही शोमध्येही काम केले.

त्यानंतर कित्येक टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला. दूरदर्शनवरील 'जुनून', 'शक्तिमान', 'घुटन', 'यहां के हम सिकंदर' या गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी साकारलेली भूमिका सर्वांच्या पसंतीस पडली.

अॉल्टर यांनी दिग्दर्शनासह 1980 ते 1990 च्या दशकात क्रीडा पत्रकारिताही केली. क्रिकेट जगतात देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याची मुलाखत घेणारे टॉम अॉल्टर हे पहिले पत्रकार होते. त्यांना 2008 मध्ये सरकारकडून पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला होता.

त्यांनी फक्त सिनेमा आणि टीव्ही मालिकांतच नाही, तर नाटकांमध्येही काम केले आहे. इतकेच नाही तर टॉम अॉल्टर यांनी तीन पुस्तकेही लिहली आहेत.

अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहत दु:ख व्यक्त केले आहे.



हेही वाचा - 

प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांची कॅन्सरशी झुंज


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा