लतादीदींची प्रकृती स्थिर, अफवा पसरवू नका…

गानसम्राज्ञी ​लता मंगेशकर​​​ यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीसंदर्भात कुठल्याही अफवा पसरवू नका, त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन मंगेशकर कुटुंबीयांकडून एका पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे.

SHARE

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीसंदर्भात कुठल्याही अफवा पसरवू नका, त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन मंगेशकर कुटुंबीयांकडून एका पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे.  

श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना न्युमोनिया आणि छातीत संसर्ग झाला होता. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून त्यांच्या तब्येतीबाबत अफवा पसरत असल्याने, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका हे सांगणारं पत्रक मंगेशकर कुटुंबाकडून जारी करण्यात आलं आहे.

शिवाय ट्विटर हँडलवरून 'लता दीदी स्टेबल आहेत. आणि हळू हळू उपचारांना प्रतिसाद देत आहेत. आम्ही त्यांना घरी घेऊन जाण्याच्या तयारीत आहोत. तुमचे आशीर्वाद आणि आधारासाठी धन्यवाद.' अशा आशयाची माहिती देण्यात आली आहे. हेही वाचा-

लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा

लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखलसंबंधित विषय
ताज्या बातम्या