लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा

गानसम्राज्ञी​ लता मंगेशकर​​​ यांच्या प्रकृतीत हळुहळू सुधारणा होत असल्याची माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी दिली. लतादीदी सध्या मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

SHARE

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत हळुहळू सुधारणा होत असल्याची माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी दिली. लतादीदी सध्या मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे लतादीदींना रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अनेक वर्षांच्या गायनामुळे तसंच वाढत्या वयोमानामुळे त्यांच्या फुफ्फुसाच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे.

त्यांच्यावर डाॅ. पॅटीट समधानी उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असली, तरी त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याने प्रकृतीत हळुहळू सुधारणा होत आहे. त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल. तोपर्यंत त्यांच्या चाहत्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये, अशी विनंती मंगेशकर कुटुंबाने दिली आहे.  हेही वाचा-

लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखलसंबंधित विषय
ताज्या बातम्या