Advertisement

'युद्ध नको, शिक्षण हवं'


'युद्ध नको, शिक्षण हवं'
SHARES

दादर - विदयार्थी भारतीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त युद्ध नको, शिक्षण हवं या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. माटुंगा सांस्कृतिक मंडळात 11 नोव्हेंबरला दुपारी ४ ते ८ दरम्यान हा कार्यक्रम होईल. लेखिका कविता महाजन यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. तसंच महासत्ता या नाटकाचं अभिवाचन या कार्यक्रमात होईल. लेखक हरि नरके, ओआरएफचे संस्थापक सुधींद्र कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई, भारत बचाव आंदोनलाचे फिरोज मिठीबोरवाला, गणाई परिवाराचे संस्थापक किशोर दादा जगताप आदी वक्ते 'युद्ध नको शिक्षण हवं' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसंच विद्यार्थीरत्न, विद्यार्थीभूषण, कार्यभूषण, उत्कृष्ट शिक्षक आणि उत्कृष्ट शाळा आणि महाविद्यालय अशा पुरस्कारांनी या वेळी विजेत्यांना गौरवण्यात येईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा