Advertisement

तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्यानं वीर दासनं मागितली माफी

वीरनं केलेल्या एका वक्तव्यामुळे तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत.

तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्यानं वीर दासनं मागितली माफी
SHARES

बॉलिवूड अभिनेता आणि विनोदवीर वीर दास हा त्याच्या खास विनोदी शैलीमुळे ओळखला जातो. वीरचे विनोद हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. मात्र, यावेळी वीरच्या एका विनोदामुळे प्रेक्षक संतापले आहेत. वीरनं केलेल्या एका वक्तव्यामुळे तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. यानंतर आता वीरनं यावर प्रतिक्रिया देत त्याच्या चुकीबद्दल माफी मागितली आहे.

वीरनं त्याच्या युट्यूब चॅनलवरून #TenOnTen चा नवीन एपिसोड शेअर केला आहे. या एपिसोडमध्ये वीरनं तृतीयपंथी समुदाय आणि त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या शब्दांवर विनोद केला आहे. त्यानंतर एका चाहत्यानं हे चुकीचं आहे अशी तक्रार वीरला केली. त्यानंतर वीरनं त्याची चूक कबूल केली आणि प्रतिक्रिया दिली आहे.

वीरच्या एका चाहत्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेसेज केला आणि त्याला हे चुकीच वाटत असल्याचं सांगितलं. त्यानंतर वीरनं त्या मेसेजचा स्क्रिनशॉट इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत माफी मागितली आहे.

ही पोस्ट शेअर करत वीर म्हणाला, ‘मी New Ten On Ten च्या भागात तृतीयपंथी समुदायाविषयी एक विनोद केला, ज्यामुळे त्या समुदायातील माझ्या एका मित्राला वाईट वाटले. त्यावेळी मला असं म्हणायचं होतं की सरकार जे करू शकत नाही ते तृतीयपंथी लोकांमध्ये करण्याचं धैर्य आहे. पण माझा गोंधळ झाला आणि ते चुकीचं झालं. आता माझा हेतू हा फक्त त्या विनोदाला स्पष्ट करण्याची जबाबदारी आहे, तुमची नाही, मला तो विनोद चुकीचा वाटला,’ असं वीर म्हणाला.

वीर पुढे म्हणाला, ‘कधी कधी लोक अस्वस्थ होतात कारण कधी तरी विनोदाचा अर्थ दुसरा होतो. माझ्या प्रेक्षकांना विनोद कळतो. ते त्याला एक विनोद समजून घेतात. त्यामुळेच जेव्हा ते माझ्याशी बोलतात तेव्हा मी ऐकतो. मला एक असा कलाकार होण्याची इच्छा आहे जो, कधीही त्याच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांना स्वीकारणं थांबवत नाही, नेहमी त्यांना एक मार्गदर्शक म्हणून समजतो. अमान तुझ्या या मेसेजसाठी धन्यवाद.’



हेही वाचा

'बेलबॉटम' नंतर 'चेहरे'देखील चित्रपटगृहांमध्ये होणाप प्रदर्शित

'या' दिवशी प्रेक्षकांना हसवायला येतोय कपिल शर्मा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा