Advertisement

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...


खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो...
SHARES

गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्धी आणि चमचमत्या बॉलिवुड इंडस्ट्रीमध्ये हरवलेला फॉर्म पुन्हा शोधण्याच्या प्रयत्नात असलेला अभिनेता सनी देओल अचानक चर्चेत आणि त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पण त्याच्या प्रसिद्धीचं कारण कोणताही सिनेमा नसून त्याचा एक व्हायरल व्हीडिओ आहे. आणि त्याचा हा व्हायरल व्हिडिओ दुसऱ्या तिसऱ्या कुणासोबत नसून चक्क अभिनेत्री डिंपल कपाडियासोबतचा आहे!
आता अभिनेता सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्यातलं नातं काय आहे हे काही जाणकारांना वेगळं सांगायची गरज नाही! 1984मध्ये या दोघांचा पहिला चित्रपट रिलीज झाला तो म्हणजे 'मंजिल-मंजिल'. असं म्हणतात, की याच चित्रपटापासून त्यांच्यातली लव्हस्टोरी सुरु झाली.पुढे डिंपलने सनी देओलसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. एवढंच नाही, तर मध्यंतरी डिंपल सनीसोबत एकत्र राहत असल्याची देखील चर्चा होती. काहींनी तर त्या दोघांनी लग्नही केल्याचं जाहीर करुन टाकलं होतं. पण त्या दोघांनीही हे कधीच स्वीकारलं नाही.हा व्हिडिओ लंडनमधल्या एका बस स्टॉपचा आहे. हा कोणता बसस्टॉप आहे त्याबद्दल खात्री नसली, तरी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती या सनी देओल आणि डिंपल कपाडियाच असल्याबद्दल मात्र कोणतीही शंका नाही. आपला ढाई किलोचा हात सनी देओल डिंपल कपाडियाच्या हातात देऊन निवांत गप्पा मारत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.या आधीही सनी देओल विविध अभिनेत्रींमुळे चर्चेत राहिला आहे. त्यामध्ये डिंपल कपाडियासोबतच अमृता सिंग आणि रविना टंडन यांचीही नावं आहेत. 'बेताब' चित्रपटादरम्यान सनीचे अमृता सिंगसोबत जोडले जाऊ लागले. पण अमृताला सनी देओलचे लग्न झाल्याचे कळताच तिने त्याच्यापासून दूर राहणे पसंत केले. त्यानंतर डिंपल सनीच्या आयुष्यात आली. अंदाजे ११ वर्षे हे दोघे एकत्र होते. ११ वर्षांपूर्वीचे नाते आजही जिवंत असल्याचाच हा व्हीडिओ पुरावा असल्याची चर्चा दोघांचेही चाहते आणि बॉलिवूड गॉसिपर्समध्ये सुरु आहे!हेही वाचा

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया...


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा