Advertisement

मै जिंदगी का साथ निभाता चला गया...


मै जिंदगी का साथ निभाता चला गया...
SHARES

देव आनंद हे नाव कुणाला माहिती नसेल असा कदाचित एकही व्यक्ती किमान भारतात सापडणं मुश्किल आहे. आपल्या सदाबहार अभिनयाने एक आख्खी पिढी वेडी करुन सोडणारा हा अवलिया अभिनेता! धरम देवदत्त पिशोरीमल आनंद एवढं मोठं नाव असलेल्या देव आनंद यांनी सिने इंडस्ट्रीत या नावाचा शॉर्टकट केला आणि त्यांचे लाखो चाहते त्यांना देव आनंद म्हणून ओळखू लागले. अशा देव आनंद यांची आज 94वी जयंती!


पहिला ब्रेक...

26 सप्टेंबर 1923 या दिवशी पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये जन्मलेल्या देव आनंद यांनी 1946 साली प्रभात फिल्म स्टुडिओच्या 'हम एक है' सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. त्यांना पहिला ब्रेक देणाऱ्या प्रभातच्या बाबुराव पैंबद्दल त्यांनी नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर तब्बल 250हून अधिक सिनेमांमध्ये देव आनंद यांनी काम केलं. पहिल्या ब्रेकनंतरक जवळपास 5 दशकं या अभिनेत्यानं हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आणि बॉलिवुडच्या इतिहासात कधीच पुसलं न जाणारं नाव उमटलं...देव आनंद!




'जिद्दी' अशोक कुमार!

अशोक कुमार यांनी देव आनंद यांना त्यांच्या आयुष्यातला पहिला मोठा ब्रेक दिला. बॉम्बे टॉकिजच्या 'जिद्दी' या सिनेमामध्ये अशोक कुमार यांनी देव आनंद यांना प्रमुख भूमिका दिली. त्यानंतर 'बाजी', 'आंधियाँ', 'टॅक्सी ड्रायव्हर', 'हाऊस नं. 44', 'नौ दो ग्यारा' असे एकामागून एक हिट सिनेमा त्यांनी केले. 'मंजिल', 'तेरे घर के सामने' अशा सिनेमांनी देव आनंद यांची रोमँटिक हिरो म्हणून प्रतिमा निर्माण केली. 'गाईड', 'असली नकली', 'जब प्यार किसीसे होता है' अशा अनेक लव्ह स्टोरी त्यांनी केल्या. त्यांच्या अभिनय शैलीमुळे अनेकदा त्यांची तुलना हॉलिवुड अभिनेता ग्रेगरी पेक यांच्याशी केली जात असे.


सुरैय्यासोबतच्या आठवणी!

1948च्या सुमारास सिने अभिनेत्री सुरैय्यासोबत त्यांचं प्रेमप्रकरण विशेष चर्चिलं गेलं. मात्र सुरैय्या यांच्या घरच्यांच्या विरोधामुळे ही प्रेमकथा नात्यामध्ये परावर्तित होऊ शकली नाही. 1954मध्ये देव आनंद यांनी अभिनेत्री कल्पना कार्तिक यांच्याशी विवाह केला.


दिग्दर्शक देव आनंद!

70 च्या दशकात आलेला 'प्रेम पुजारी' हा दिग्दर्शक म्हणून देव आनंद यांचा पहिला चित्रपट. 'प्रेम पुजारी' फ्लॉप झाला असला, तरी त्यानंतरचा 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटाने दिग्दर्शक म्हणून त्यांना चांगलं नाव मिळवून दिलं. संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी 19 सिनेमांचं दिग्दर्शन केलं असून 35 सिनेमांची निर्मिती केली.


शेवटचा सिनेमा...

3 डिसेंबर 2011 रोजी रात्री लंडनच्या द वॉशिंग्टन मेफेअर हॉटेलमध्ये ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं 88व्या वर्षी निधन झालं. आणि अवघ्या महिनाभरानंतर त्यांचा शेवटचा सिनेमा 'चार्जशीट' रिलीज झाला. 2001मध्ये त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. तर 2002मध्ये त्यांना सिनेविश्वातला मानाचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. याव्यतिरिक्त अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं.

एव्हरग्रीन, सदाबहार, रोमँटिक अशा कितीतरी प्रतिमा देव आनंद यांना या 5 दशकांच्या कारकिर्दीत मिळाल्या, त्यांनी त्या गाजवल्या आणि चाहत्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं. पण त्यांची हाडाचा अभिनेता ही प्रतिमा मात्र चाहत्यांना सर्वात जास्त पसंतीस उतरली हे नक्की!


देव आनंद यांची काही गाजलेली गाणी!

  1. मै जिंदगी का साथ निभाता चला गया...


2. गाता रहे मेरा दिल


3. माना जनाब ने पुकारा नहीं


4. ये दिल, ना होता बेचारा


5. ख्वाब हो तुम या कोई हकिकत




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा