'बँक चोर'मध्ये विवेक सीबीआय ऑफिसर

 Mumbai
'बँक चोर'मध्ये विवेक सीबीआय ऑफिसर
Mumbai  -  

बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय पुन्हा एकदा अॅक्शन चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याचा नवीन आणि कूल लूक पाहायला मिळणार आहे. 'बँक चोर' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात विवेक सीबीआय ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. विवेक ऑबेरॉयचं फर्स्ट पोस्टर प्रदर्शित झालंय. 'पेहले गोली फिर सवाल' अशी या पोस्टरची टॅगलाइन आहे.

'बँक चोर' हा चित्रपट अशा तिघा चोरट्यांवर आधारीत आहे जे बँकेत चोरी करण्याच्या तयारीत असतात. पण बँकेत चोरी करण्यासाठी ते जो दिवस ठरवतात तो त्यांच्यासाठी काळा दिवस ठरतो. त्या दिवसापासून त्यांच्यासोबत काही ना काही वाईट घडत असते. या चित्रपटात विवेक ऑबेरॉय, रितेश देशमुख आणि रेखा चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर यात किंग ऑफ देसी रॅप बाबा सॅगलचीही झलक पाहता येईल. बँकेत चोरी होत असते तेव्हा बाबा सॅगलही तिकडेच असतो. एका होस्टेजची भूमिका साकारताना तो दिसणार आहे.

विवेक ऑबेरॉयच्या घरात चोरी

रितेश देशमुखच्या हातात बेड्या पाहून तुम्हालाही झटकाच बसला असेल ना? पण तसे नाही आहे. खरंतर हा एक चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे. विवेक ऑबेरॉयच्या घरातही चोरीच्या घटना वाढल्या होत्या. कधी जेवण तर कधी पैसे गायब असायचे. तर कधी मुलांची खेळणीही गायब असायची. या मागे कोणाचा हात आहे यासाठी विवेक सापळा रचतो. या चोराला पकडण्यात येते आणि पोलिसांच्या हवाली करण्यात येते. विवेक मीडियाला बोलवतो आणि मीडियासमोर या चोराचा पर्दाफाश करतो. या चोराला पाहून सर्वच अवाक होतात. कारण हा चोर दुसरा तिसरा कोणी नाही रितेश देशमुख असतो. एका हटके अंदाजात 'बँक चोर' चित्रपटाचे प्रमोशन विवेक आणि रितेशने केले.

Loading Comments