Advertisement

बिग बॉसच्या घरातील ६ बोटांचा किस्सा काय?


बिग बॉसच्या घरातील ६ बोटांचा किस्सा काय?
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉसमध्ये आता खऱ्या अर्थाने माइंड गेम सुरू झाला आहे. घरातील डायनिंग टेबलवर किचन पोलिटिक्स रंगत आहे. मेघाची प्रत्येक गोष्टीतील लुडबुड सुशांत शेलार याला खटकत आहे. तिला सगळंच कसं समजतं, सगळंच कसं येतं यावर सुशांत आणि घरातली चौकडी खलबतं रचतायत. अशातच विनीत भोंडेबद्दलच्या एकएक गोष्टी लोकांना कळायला सुरुवात होणार आहे. विनीत घरातल्यांना आपल्या पायाला ६ बोटं असल्याचं सांगणार आहे. घरातल्या सदस्यांबरोबर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या ६ बोटांचा किस्सा कळणार आहे.


प्रार्थना यज्ञाचं आयोजन

बिग बॉस घरातील नॉमिनेट सदस्यांसाठी प्रार्थना यज्ञ या कार्याची घोषणा करणार असून, या कार्यानुसार नॉमिनेट सदस्यांना सदीच्छा देण्यासाठी हा यज्ञ आहे. तसेच घरातील सदस्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल सदीच्छा असणे खूप महत्त्वाचे आहे, असं बिग बॉसचं म्हणने असल्या कारण्याने या यज्ञामध्ये घरातील प्रत्येकाला सहभागी होणं अनिवार्य असणार आहे. या यज्ञ कुंडातील अग्नी अखंड प्रज्वलित रहाणे अनिवार्य आहे, जर तो विजला तर हे कार्य असफल मानण्यात येईल. तेव्हा घरातील सदस्य हा कसे टास्क पूर्ण करतील? हे बघणे रोमांचक असणार आहे. कोणत्या अडचणी येतील? आणि त्यावर ते कसे मार्ग काढतील. जोपर्यंत बिग बॉसचा आदेश येतं नाही तोपर्यंत हे कार्य सुरू असेल.


उषा नाडकर्णींंना नॉमिनेट

दर सकाळी घरातील सदस्य योगा, व्यायाम करत असताना दिसतात. आता या सगळ्यांना एक फिटनेस गुरू मिळाला आहे आणि तो आहे राजेश शृंगारपुरे. घरामध्ये सकाळी एकीकडे फिटनेसची रेसिपी रंगत असताना तिकडे आत घरात आरती आणि उषाताई यांच्यात चपात्या बनवण्यावरून खटके उडत होते. याचा परिणाम उषाताई चपात्या न बनवता निघून गेल्या. घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये उषा यांना नॉमिनेट केल्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी घरातील इतर सदस्यांना टोमणे मारण्यास सुरुवात केली.


उषाताई पडल्या एकट्या 

घरातील सगळ्यांना माझी भीती वाटेत म्हणूनच मला नॉमिनेट केले असा त्यांनी घरच्या सदस्यांवर आरोप लावला. घरामध्ये सगळ्यांनी आपआपले ग्रुप केले आहेत आणि ते मला समजत आहे असे देखील त्यांनी ऐकवून दाखवले. थोडक्यात आरतीला उद्देशून उषाजींनी लेकी बोले सुने लागे ही खेळी सुरू केली आहे. हे सगळं होत असताना उषाताई बिग बॉसच्या घरामध्ये एकट्या तर पडल्या नाही ना? हा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडल्याशिवाय राहणार नाही.


कोणावर वैतागली ऋतुजा?

भूषण कडू याने नाना पाटेकर यांची केलेली अॅक्टिंग देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. घरातील सदस्यांमध्ये DOG & THE BONE हा खेळ रंगणार आहे. तसेच ऋतुजा कोणावर वैतागली? अनिल थत्ते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आरती बरीच अस्वस्थ आहे आणि त्यामुळेच सुशांत शेलारने आरतीचं सांत्वन केलं. पण त्यामुळे बिघडत असलेले वातावरण सुधारेल का?


हेही वाचा -

'बिग बॉस'च्या घरात आऊ पडल्या एकट्या


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा