Advertisement

'बिग बॉस'च्या घरात आऊ पडल्या एकट्या


'बिग बॉस'च्या घरात आऊ पडल्या एकट्या
SHARES
Advertisement

बिग बॉस मराठी रहिवासी संघामध्ये खऱ्या अर्थाने आता कुठे माइंड गेम सुरू झाला आहे. घरामध्ये झालेल्या नॉमिनेशन प्रक्रीयेमुळे नक्की कोण कोणासोबत आहे? आणि कोण कोणाच्या विरोधात आहे हे काही प्रमाणामत स्पष्ट झालं आहे. उषा या त्यांच्या नॉमिनेशनमुळे घरातील सदस्यांवर काही प्रमाणात नाराज आहेत. आणि ही नाराजगी त्यांनी घरच्यांसमोर व्यक्त करायला सुरुवात केली आहे. उषा नाडकर्णी आणि अनिल थत्ते यां दोघांमध्ये असलेले वाद आता विकोपाला पोहचले असून त्यामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया आल्यामुळे घरामध्ये नाराजीचं वातावरण आहे.फिटनेसची रेसिपी

घरामध्ये सकाळी एकीकडे फिटनेसची रेसिपी रंगत असताना तिकडे आत घरात आरती आणि उषाताई यांच्यात चपात्या बनवण्यावरून खटके उडत होते. याचा परिणाम उषाताई चपात्या न बनवता निघून गेल्या. घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये उषा यांना नॉमिनेट केल्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी घरातील इतर सदस्यांना टोमणे मारण्यास सुरुवात केली. 

'घरातील सगळ्यांना माझी भीती वाटेत म्हणूनच मला नॉमिनेट केलं असा त्यांनी घरच्या सदस्यांवर आरोप लावला. घरामध्ये सगळ्यांनी आपआपले ग्रुप केले आहेत आणि ते मला समजत आहे', असं देखील त्यांनी ऐकवून दाखवलं. थोडक्यात आरतीला उद्देशून उषा यांनी लेकी बोले सुने लागे ही खेळी सुरू केली आहे. हे सगळं होत असताना आऊ म्हणजेच उषा या बिग बॉसच्या घरात एकट्या तर पडल्या नाही ना? हा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडेल.


हेही वाचा - 

बिग बॉसच्या घरात रंगतंय गॉसिप्स

'बिग बॉस' सिझन १२ मध्ये सर्वसामान्यांनाही संधी

संबंधित विषय
Advertisement