Advertisement

'बिग बॉस' सिझन १२ मध्ये सर्वसामान्यांनाही संधी


'बिग बॉस' सिझन १२ मध्ये सर्वसामान्यांनाही संधी
SHARES

कलर्स टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या बिग बॉसने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. देशातील लोकप्रिय रिअॅलिटी शो पैकी एक असलेल्या या शोच्या मागील काही सिझनमध्ये भारत आणि जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. आता येत्या सिझनमध्ये बिग बॉसचं घर हे सामान्य माणसांसाठीही खुलं असेल.


चॅनेल आणि प्रॉडक्शन हाऊसने यासाठी ऑडिशनची प्रक्रियाही सुरू केली आहे. ऑडिशन फॉर्मवर सुचित करण्यात आलं आहे की बिग बॉस १२ सुरू होत आहे. यावेळी, आमचा अंदाज वेगळा असेल. यावेळी आपण आपल्या जोडीदारासह बी बी 12 गॅंगमध्ये सामील होऊ शकता! विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. आपण आपला जोडीदार म्हणून बहीण, मित्र, बॉस किंवा सासू यांची निवड करू शकता. मग प्रतिक्षा कसली करता? तुमची प्रतिभा आणि बुद्धीमत्ता दाखवा आणि नाव, प्रसिद्धीसह बक्षीसं जिंकण्यास तयार राहा'

टीव्ही इंडस्ट्रितील अनेक लोकप्रिय चेहरे बिग बॉसचे मानकरी ठरले. शिल्पा शिंदे ही बिग बॉस सिझन ११ची विजेती ठरली, तर हिना खान (स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या केहलाता है मधील अक्षरा) हीने द्वीतिय क्रमांक पटकावला. निर्माता विकास गुप्ता यांनी आपल्या साधेपणाने सर्वांची मनं जिंकली.

कलर्स टीव्ही आणि प्रॉडक्शन हाऊसने वचन दिलं आहे की, बिग बॉस १२ नेहमीपेक्षा वेगळं असेल. पण याबाबत अधिक घोषणा अपेक्षित आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement