बिग बॉसच्या घरात रंगतंय गॉसिप्स


SHARE

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांचा प्रवास १५ एप्रिलपासून सुरू झाला आहे. घरात गेल्यापासूनच स्पर्धक एकजुटीने रहाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अवघ्या २ दिवसातच घरामध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. आता एवढ्या बायक्या एकत्र आल्यावर गॉसिप तर होणारच.


सासुबाई, पिंकी पिंगळे कोण?

बिग बॉसच्या घरात गॉसिपला पहिल्याच दिवसापासून सुरुवात झाली आहे. स्पर्धकांनी एकमेकांना वेगवेगळी नावं ठेवण्यास सुरुवात केली आहे. या घरामध्ये सासूबाई आणि पिंकी पिंगळे यांची धमाल मस्ती सुरू आहे. या सासुबाई आणि पिंकी पिंगळे कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.


घरातील स्पर्धकांनी घरातील दोन सुंदर मुलींना म्हणजेच रेशम टिपणीस आणि मेघा धाडे हिला अनुक्रमे सासूबाई आणि पिंकी पिंगळे अशी नावे ठेवली आहेत. मेघाच्या पिंक कलरच्या आवडीमुळे तिला घरच्यांनी पिंकी पिंगळे हे नाव दिलं आहे. तर रेशम टिपणीस हिला घरच्यांनी सासूबाई हे नाव ठेवले आहे.


बिग बॉसच्या घरातल्या हिरोईण

आरती, उषा नाडकर्णी आणि रेशम टिपणीस यांनी आपल्या मराठमोळ्या मुलींना बॉलिवूडच्या हिरोईणची नावं दिली आहेत. स्मिता गोंदणकर हिला प्रियंका चोप्रा, सई लोकूर हिला कतरिना कैफ आणि मेघा धाडे हिला ऐश्वर्या राय बच्चन हे नाव मिळालं आहे.

पहिल्या दिवसांपासूनच सुरू झालेलं हे गॉसिप प्रेक्षकांचं मात्र चांगलं मनोरंजन करणार आहे. बिग बॉसमधील भांडण, गॉसिप, मैत्री बघण्यासाठी बिग बॉस पुढचे भाग अजिबात चुकवू नका.


हेही वाचा - 

असा पार पडला बिग बॉसचा दुसरा दिवस...

'या' वस्तूंना बिग बॉसच्या घरात नो एन्ट्री!

संबंधित विषय
ताज्या बातम्या