Advertisement

असा पार पडला बिग बॉसचा दुसरा दिवस...


असा पार पडला बिग बॉसचा दुसरा दिवस...
SHARES
Advertisement

बिग बॉसच्या घरातील दुसरा दिवस हा एका नव्या गाण्याने सुरू झाला. सोमवारी झालेल्या नॉमिनेशनमुळे सगळेच सतर्क दिसले. मंगळवारी स्वयंपाक घरातील दृश्य जरा वेगळच असणार आहे. स्वयंपाक घरामध्ये तसेच इतर छोट्या - मोठ्या कामांमध्ये सगळेच मदत करताना दिसतील. सई लोकूर आणि सुशांत शेलार यांनी स्वयंपाक घरामध्ये बरीच मदत केली. दरम्यान सगळ्यांच्या आवडत्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांनी स्वयंपाक करत असताना दरम्यानच्या काही टिप्स मुलींना दिल्या.


बिग बॉसच्या घरात पुढे काय?

बिग बॉस मराठीच्या पहिल्या कॅप्टनचा मान विनीत भोंडे याला मिळाला. विनीतने कॅप्टन बनल्यानंतर स्पर्धकांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये मंगळवारी अंताक्षरी आणि डमशराजचा खेळ रंगणार आहे. ज्यामुळे घरामध्ये खेळीमेळीचं वातावरण बघायला मिळणार आहे. मंगळवारी भूषण कडू, आस्ताद काळे या दोघांसोबत घडलेले बरेच मजेदार किस्से प्रेक्षकांना समजणार आहे.

रेशम टिपणीस आणि मेघा धाडे यांनी आपल्या मनोरंजन क्षेत्रामधील प्रवासाबद्दल घरच्यांना माहिती दिली. मेघा धाडे हिने तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी, तिचा जळगाव ते मुंबई पर्यंतचा प्रवास घरच्यांना सांगितला. मेघा हे सांगताना इतकी भाऊक झाली की तिला रडूच कोसळले. घरातील सगळ्यांनीच मेघाला आधार दिला, पण आरतीला हे सगळे ऐकून रडायला आलं. मेघाने असं काय सांगितलं कि आरती आणि घरातील सगळेच भाऊक झाले? हे मंगळवारी तुम्हाला बिग बॉस बघितल्यावरच समजणार आहे.


वादाची पहिली ठिणगी पडली

बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासूनच खटके उडायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अनिल थत्ते आणि उषा नाडकर्णी या दोघांमध्यले मतभेद सगळ्यांसमोर आले आहेत. या दोघांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. अनिल थत्ते यांनी केलेल्या आत्महत्याच्या वक्तव्यामुळे घरामध्ये चर्चेला उधाण आलं आहे. अनिल थत्ते घरामध्ये बऱ्याच मुद्द्यांवर चर्चेत असतात. मग ते त्यांचे कपडे असो वा टिकली वा त्यांची प्रकृती किंवा त्यांचे विचार असो. दुसरीकडे रेशम आणि आस्ताद काळे या दोघांना उषा नाडकर्णी यांच्या प्रकृतीविषयी बरीच काळजी असल्याचे त्यांनी सांगितलं. घरामध्ये इतकी लोकं एकत्र रहाणार म्हणजे भांड्याला भांडं हे लागणारच.


हेही वाचा - 

बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवशी काय घडलं?

'या' वस्तूंना बिग बॉसच्या घरात नो एन्ट्री!

संबंधित विषय
Advertisement