Advertisement

बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवशी काय घडलं?

स्पर्धक वाट बघत असलेली गोष्ट शेवटी बिग बॉसने सांगितली. बिग बॉस मराठी मधील पहिली परीक्षा आणि घरातील सदस्यांमधील अपात्र नावं सर्वानुमताने घोषित करण्याचा संदेश बिग बॉसने दिला. आता कोण कोणाचं नावं घेणार? परीक्षा काय असणार? कोण जिंकणार?

बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवशी काय घडलं?
SHARES

बहुप्रतिक्षीत बिग बॉस मराठीला अखेर सुरूवात झाली. मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये रेशम टिपणीस, विनीत भोंडे, उषा नाडकर्णी, अनिल थत्ते यांच्यासह एकूण११ कलाकारांना बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळाला. बिग बॉसच्या घरात काय चाललय याची उत्सुकता मराठी प्रेक्षकांमध्ये जास्त आहे. पहिल्या दिवशी तरी सगळ्या स्पर्धकांनी एकमेकांचं जोरदार स्वागत केलं खरं. पण त्यांच्यातील ही मैत्री किती दिवस टिकणार हे बघावं लागेल.


काय घडलं बिग बॉसच्या घरात?

बिग बॉसच्या पहिल्या दिवसाची सुरुवात जरा उशिराच झाली. बिग बॉसच्या नियमानुसार पहिल्याच दिवशी सगळं सामान घरातील सदस्यांना देता येत नाही. पहिला दिवस असल्यामुळे सगळेच आपल्या सामानाशिवाय रहात होते. चहा - पाण्याची आणि सकाळच्या नाश्त्याची सोय बिग बॉसने करून ठेवली होती. गाणं वाजण्याअगोदर घरामधील बरेचसे सदस्य उठले होत. काही गप्पा मारत होते तर काही सकाळचा व्यायाम करत होते. जुई गडकरी हिने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. दिवस उशिरा सुरु झाल्याने दुपारचं जेवण देखील उशिराच झालं.



गप्पांमध्ये मेघा धाडेने तिला स्वयंपाक करायला आणि किचनचं सामान लावायला खूप आवडतं असं म्हटलं. जुईला जेवण तर येते, पण तिच्या एका वाक्यावर सगळ्यांनाच हसू आलं. “मला फक्त एका वेळी एकाच व्यक्तीसाठी चहा बनवता येतो. त्यामुळे १५ जणांसाठी मला चहा १५ वेळा बनवायला लागणार”.
पहिला दिवस असल्याने, बिग बॉसने नियम पत्र पाठवले होते, जे मेघा धाडे हिने घरच्या सदस्यांना वाचून दाखवले. तसेच, काही वेळातच किचनचे समान देखील घरच्यांना मिळाले. गप्पा गप्पांमध्ये आरतीने पुष्कर मला आवडायचा हे घरच्यांसमोर सांगताच सगळ्यानी पुष्कर - आरतीला चिडवायला सुरुवात केली.



घरामध्ये येताच मनोरंजनाचा तडका Glam गर्लनी द्यायला सुरुवात केली आहे. मेघा, सई, रेशम, जुई तसेच सीमा यामध्ये कोण जास्त Glamorous दिसणार? यामध्ये चढाओढ सुरु होणार आहे. किचनमध्ये स्वयंपाक करत असताना रेशम, उषा नाडकर्णी अणि आरती सोलंकी यांनी घरातील इतर मुलींना वेगळी नावं ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे जसजसे दिवस पुढे जाणार, तसतशी ही स्पर्धा अजूनच रंगत जाणार यात शंका नाही. स्पर्धक वाट बघत असलेली गोष्ट शेवटी बिग बॉसने सांगितली. बिग बॉस मराठी मधील पहिली परीक्षा आणि घरातील सदस्यांमधील अपात्र नावं सर्वानुमताने घोषित करण्याचा संदेश बिग बॉसने दिला. आता कोण कोणाचं नावं घेणार? परीक्षा काय असणार? कोण जिंकणार? हे कळण्यासाठी बिग बॉसचा आजचा भाग नक्की बघा.




हेही वाचा

विनीत भोंडे बनला मराठी बिग बॉसच्या घराचा गाईड!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा