Advertisement

'या' वस्तूंना बिग बॉसच्या घरात नो एन्ट्री!


'या' वस्तूंना बिग बॉसच्या घरात नो एन्ट्री!
SHARES

बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोचा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला. यावेळी बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांची एन्ट्री घरामध्ये झाली. ज्यामध्ये पुष्कर जोग, सरस्वती मालिकेमधील राघव म्हणजे आस्ताद काळे आणि देविका ही भूमिका साकारलेली जुई गडकरी, रेशम टिपणीस, मेघा धाडे, आरती सोलंकी, सई लोकूर हे कलाकार होते. बिग बॉसच्या घरामध्ये जाण्यापूर्वी या सगळ्यांच्या सामानांची यावेळी तपासणी झाली. या तपासणीमध्ये काही अतरंगी गोष्टी आढळून आल्या.


'या' वस्तू घरात घेऊन जाण्यास मनाई

बिग बॉसच्या घरामध्ये १०० दिवस रहायचं म्हटल्यावर स्पर्धक कलाकार आपल्या आवडत्या छोट्या - मोठ्या वस्तू घेऊन येणार हे तर नक्कीच! पण कलाकारांना सगळ्याच वस्तू घरामध्ये घेऊन जाण्यास परवानगी नसते. यावेळी कलाकारांना त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या काही वस्तू घरामध्ये नेण्यास मनाई केली गेली, तर काही त्यांच्यासोबत पाठवण्यात आल्या.

कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेतील आस्ताद काळे याने बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी बऱ्याच गोष्टी आणल्या. ज्यामध्ये २० हून अधिक परफ्युमचा समावेश होता. तसेच पुष्कर जोग याने भरपूर हेअर प्रोडक्ट्स आणले होते. यावेळी स्पर्धक अभिनेत्रीही आपल्या बरोबर बऱ्याच गोष्टी घेऊन आल्या होत्या. यामध्ये जुई गडकरी हिला बिग बॉसच्या घरात सॉफ्ट टॉय घेऊन जायचा होता. तर ऋतुजा धर्माधिकारी हिला तिचा एक जुना चमचा घेऊन जाण्याची इच्छा होती, कारण ती कोणीही वापरलेला चमचा वापरत नाही. अनिल थत्ते यांनी एक वेगळ्याच प्रकारची टोपी आणली होती, जी त्यांना घरामध्ये घेऊन जायची होती आणि घराचा जो कोणी कर्णधार होईल त्याला ती कॅप देणार होते. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या स्पर्धक कलाकारांच्या बॅगेत सापडल्या होत्या. त्या सर्व वस्तू माघारी ठेवण्यास सांगण्यात आले आहे!



हेही वाचा

बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवशी काय घडलं?

'बिग बॉस' सिझन १२ मध्ये सर्वसामान्यांनाही संधी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा