Advertisement

...जेव्हा किंग खानला राग येतो


...जेव्हा किंग खानला राग येतो
SHARES

हा फोटो पाहून तुम्हाला वाटेल की कोणत्या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे की काय? पण ही चित्रपटाचे शूटिंग नाही तर खरा खुरा घडलेला प्रसंग आहे. तुम्ही म्हणाल बॉलिवूड बादशहा किंग खान रिअल लाईफमध्ये कुणावर हात उचलणार नाही. पण रिअल लाईफमध्ये शाहरुख एकाला मारायला त्याच्या अंगावर धावून गेला.

शाहरुख खान त्याच्या 'जिंदादिल' स्वभावासाठी ओळखला जातो. पण एका रिअॅलिटी शो दरम्यान शाहरूखचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि तो शोच्या आयोजकांवर भडकला. हा रिअॅलिटी शो अरबी देशात अतिशय प्रसिद्ध आहे. शाहरुख या शोमध्ये एक पाहुणा कलाकार म्हणून उपस्थित होता.

झालं असं की, शाहरुख सहभागी झालेल्या या एपिसोडचे शूटिंग अबू धाबी येथे असणाऱ्या निर्जन स्थळावर सुरू होते. या शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींसोबत एक प्रँक करण्यात येतो. तसाच एक प्रँक किंग खानसोबतही करण्यात आला. शोमधील दोन स्पर्धकांसोबत शाहरुखला वाळवंटात नेण्यात आले. पण वाळवंटातील दलदलीत त्यांची गाडी अडकते. गाडीसोबत शाहरुख आणि इतर दोन साथीदार दलदलीत फसत जातात. यातील एका साथीदाराला दलदलीतून काढण्याचा प्रयत्न करत असताना समोर एक भयानक प्राणी येतो. त्यामुळे शाहरुख आणि त्याचे साथीदार भलतेच घाबरले. पण थोड्याच वेळात हा प्राणी खरा नसून खोटा असल्याचं उघड होतं. अशा प्रकारे प्रँक करणे हा या शोचा भाग असल्याचं कळताच शाहरुखचा पारा चांगलाच चढला. त्यामुळे शाहरुख अँकर आणि आयोजकांवर चांगलाच भडकला. दलदलीतून बाहेर येताच शाहरुख अँकरला मारायलाच धावला. पण झालेल्या प्रकाराबद्दल अँकरने अनेकदा शाहरुखची माफी मागितली. पण शाहरुख एवढा भडकला होता की तो तिथून निघून गेला.

बहुधा शाहरुखचा राग शांत झाला असावा. कारण शाहरुख पुन्हा या टॉक शोमध्ये सहभागी झाला होता. शाहरुखला या प्रँकविषयी माहिती असावी, असा अंदाज नेटिझन्सकडून व्यक्त केला जातोय.

संबंधित विषय
Advertisement