'रात्रीस खेळ चाले'तले आरोपी कोण?

  Pali Hill
  'रात्रीस खेळ चाले'तले आरोपी कोण?
  मुंबई  -  

  'रात्रीस खेळ चाले' मालिका लवकरच संपणार ही बातमी ऐकून बरेच प्रेक्षक निराश झाले. खुप कमी वेळातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले यात शंका नाही. पण ती आता त्याच्या शेवटापर्यंत पोहचली आहे. यामुळे या मालिकेतल्या नायकांच्या घरी घडणारे रहस्य आता उलगडणार का? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

  नुकतेच रात्रीस खेळ चालेच्या सेट वरचे 2 फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये मालिकेतल्या निलिमा आणि सुषमा यांना पोलीस बेड्या ठोकून घेऊन जाताना दिसत आहेत. आता घडणाऱ्या गोष्टीमागे निलिमा की सुषमा? त्यामागचे कारण काय? निलिमाने सुषमाला साथ तर देत नलेल ना? असे सर्वच प्रश्न आता पडू लागलेत. पण या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्येच समजतील.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.