Advertisement

'झी युवा'ने केला 'स्त्री शक्तीचा' सन्मान


'झी युवा'ने केला 'स्त्री शक्तीचा' सन्मान
SHARES

स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत आपल्या जबाबदऱ्या पार पाडत असते. कधी मुलगी तर कधी बहिण, कधी पत्नी तर कधी आई. प्रत्येक वेळी ती स्त्रीत्वाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडते असते. आज स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही हे नव्याने सांगायला नको. अशाच कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान 'पुणे महोत्सव'मध्ये करण्यात आला आहे.



या महोत्सवाच्या निमित्ताने 'झी युवा'ने खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान केला आहे. स्व कर्तृत्वावर विविध क्षेत्रांत नाव कमावणाऱ्या प्रणिती शिंदे (तरुण राजकारणी), पूर्वा बर्वे ( बॅडमिंटन प्लेअर ), गौरी गाडगीळ ( कलाकार ), ऋतुजा केकावळे (विद्यार्थी ), कृष्णा पाटील ( एव्हरेस्टवीर गिर्यारोहक ) यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.

मराठी इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकारांचे परफॉर्मन्स या कार्यक्रमात पाहायला मिळतील. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, संस्कृती बालगुडे, सागर कारंडे, विशाखा सुभेदार, समीर चौगुले, मिलिंद शिंतरे, विजय पटवर्धन, मयुरेश पेम, प्राजक्ता माळी, तेजस बर्वे, ज्ञानदा रामतीर्थकर, रेशमप्रशांत आणि संगीत सम्राटाचे स्पर्धक पुणे महोत्सवात स्वतःची कला सादर करणार आहेत .  



संगीत, नृत्य, कला, गायन, वादन यांचा मिलाफ असलेला 'पुणे महोत्सव' ७ सप्टेंबर २०१७ ला दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता झी युवावर पहायला मिळणार आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा