अबब... 8 फुटांचा अजगर

कुर्ला - पाहताय ना हा भलामोठा अजगर... कुर्ला पश्चिम इथं असलेल्या न्यायालयासमोर एका झाडावर हा अजगर आढळला. आधी भांवावलेल्या रहिवाशांनी नंतर पोलीस आणि सर्प मित्रांना बोलावून घेतंल. सर्प मित्रांनी चक्क झाडावरून हा अजगर पकडला. त्यानंतर बिनविषारी असणाऱ्या मात्र सर्वांच्या मनात धडकी भरवणाऱ्या अजगराला ठाण्याजवळील वनात सोडण्यात आले. खऱ्या जंगलातून वाट चुकलेला हा अजगर सिमेंटच्या जंगलात अडकला. सुदैवाने सर्प मित्रामुळे त्याला नवे जीवदान मिळाले असेच म्हणावे लागेल. 

Loading Comments