Advertisement

Aarey Forest: मुंबईतील सर्वात मोठ्या जंगलाबद्दल जाणून घ्या

जंगल दिनानिमित्त आम्ही आरे बद्दल माहिती देणार आहोत.

SHARES

मुंबई लाइव्हनं एक नवीन सिरिज सुरू केली आहे. ज्यामध्ये मुंबईच्या ए टू झेड (A to Z) अशा सर्व ठिकाणांचा समावेश आहे. मुंबईतल्या या सर्व ठिकाणांची आम्ही सविस्तर माहिती देऊ. तर आज जंगल दिनानिमित्त आम्ही आरे बद्दल माहिती देणार आहोत.

मुंबई आणि ठाण्याच्या मध्ये संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य आहे. या अभयारण्याच्या दक्षिण बाजूला आरे कॉलनी वसलेली आहे. तिथं जाण्यासाठी गोरेगाव, जोगेश्वरी तसंच पवई या परिसरातून चांगल्या रस्त्याची सोय आहे.

मुंबईच्या आरे दूध कॉलनीला मुंबईचं फुफ्फुस म्हणून पण ओळखतात.  मेट्रो लाइनसाठी मेट्रो शेड बांधण्याची योजना असल्यानं या भागात मागील दोन वर्षांपासून झाडं तोडली जात आहेत. याचाच विरोध पर्यावरण प्रेमी करत आहेत.   मात्र, आता आरेत कारशेड बनवण्याची योजना रखडली असून कांजूरमार्ग इथं मेट्रो शेड तयार करण्याचा प्रस्ताव आहे.

आरे कॉलनी परिसरात पवई तलाव, विहार सरोवर हे तलाव आहेत. तसंच परिसरामध्ये फिरण्यासाठी उद्यानही आहे. १९७७ मध्ये आरे जंगलातील २०० हेक्टर क्षेत्रावर फिल्म सिटीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. याच परिसरातून पुढे गेलं की, दादासाहेब फाळके चित्रपटनगरी आहे. या ठिकाणी अनेक चित्रपट तसंच मालिकांचं चित्रीकरण सुरू असतं.

आरे कॉलनी म्हणून ओळखला जाणारा हा भूभाग १९५१ साली सरकारच्या दुग्धव्यवसाय विकास विभागाकडे देण्यात आला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याची पायाभरणी केली होती, असं सांगितलं जातं.

पण त्यातल्या मर्यादित भागावरच गाई-म्हशींचे गोठे उभारण्याची, त्यांच्यासाठी कुरणं त्यार करण्याची परवानगी मिळाली. तर बाकीच्या भागात जंगल उभं राहिलं. मुंबईची मिठी नदीही याच आरे कॉलनीच्या जंगलातून वाहते. मुंबईत पडणारं पावसाचं पाणी समुद्रात नेणारी ही महत्त्वाची ड्रेनेज सिस्टिम आहे.

आरे कॉलनीत पूर्वीपासूनच २९ आदिवासी पाडेही आहेत. तिथे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांचं आयुष्य जंगलावर अवलंबून आहे. इथं राहणाऱ्या कोकणी आदिवासी समाजाच्या आशा भोये सांगतात, "मुंबईचे नागरीक असूनही आम्हाला इथे प्राथमिक सुविधा मिळत नाहीत. आता मेट्रो अधिकारी आमचं जंगल आमच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतायत." याआधी आरे कॉलनीतल्या आदिवसींचं दुसरीकडे पुनर्वसन करण्याचया प्रस्तावांनाही विरोध झाला होता.

या जंगलाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचा व्हिडिओ पाहा.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा