Advertisement

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली


मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली
SHARES

मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हवेचा जोर कमी झाल्याने मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली होती. पण आता हवेची गुणवत्ता सुधारल्याने मुंबईकारांना जाणवणारा प्रदूषणाचा त्रास थोडाफार कमी होऊन प्रदूषणमुक्त हवेत श्वास घेणे शक्य होणार आहे.

‘सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’ (सफर) तर्फे नोंदविलेल्या निरीक्षणातून मुंबईतील हवेची गुणवत्ता समाधानकार असून प्रदूषित हवा काही प्रमाणात कमी झाली आहे.


2016 मधील हवेची गुणवत्ता

2016 मध्ये नोंदवलेल्या मुंबईतील हवेची गुणवत्ता (अतिसूक्ष्म धुलिकणाचं प्रमाण) 2.5 (पीएम) आणि वार्षिक सरासरी पातळी 70 मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर होतं. पण गेल्या वर्षी ते 60 मायक्रोग्रॅम प्रति घन मीटरपर्यंत कमी झालं.

यासंदर्भात सफरचे संचालक डॉ गुफरान बेग यांनी मुंबई लाईव्हला दिलेल्या माहितीत सांगितलं, हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारच्यावतीने पावले उचलली जात आहेत. याचबरोबर शहरात अनेक ठिकाणी हवेतील पीएमचं प्रमाण 2.5 पर्यंत स्थिर आहे. मंगळवारी शहरातील हवेतील गुणवत्ता 41 पर्यंत होती.

याचदरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड (एमपीसीबी) ने हवेतील गुणवत्ता सुधारित ठेवण्यासाठी हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली आहे. याचसोबत औद्योगित पर्यावरण नियमांचं पालन केल्यास काही वर्षांमध्ये परिणाम चांगले दिसतील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा