Advertisement

मुंबईच्या स्वच्छतेचा ध्यास...एएलएम!


मुंबईच्या स्वच्छतेचा ध्यास...एएलएम!
SHARES

मुंबई स्वच्छ आणि सुंदर रहावी यासाठी एएलएम(ALM) संकल्पनेचा उदय झाला. सुरुवातीच्या काळाच मुंबईभर तब्बल 600 एएलएम कार्यरत होत्या. पण आज त्यांची संख्या कमी होऊन 276 वर आली आहे. मात्र तरीदेखील या एएलएमच्या कामात आणि उत्साहात फरक पडलेला नाही. मात्र असे करताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

पालिकेच्या जी नॉर्थ विभागातील एएलएमही अशाच प्रकारे सॉलि़ड वेस्ट मॅनेजमेंट आणि स्वच्छ मुंबईसाठी प्रयत्न करत आहे. मात्र त्यामध्ये पालिकेच्या चुकलेल्या धोरणाचा अडथळा ठरत असल्याचं फोरमचे अध्यक्ष अशोक रावत यांचं म्हणणं आहे. 'ओला आणि सुका कचरा विभागातून वेगळा करुन दिला तरीही पालिकेच्या गाडीत शेवटी तो एकत्रच होतो. त्यामुळे कचरा वेगळा करुन देण्याचा काहीच फायदा होत नाही,' अशी प्रतिक्रिया अशोक रावत यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

मात्र यावर एएलएमचे अधिकारी सुभाष पाटील यांनी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. 'मुंबईतल्या २४ वॉर्डमध्ये प्रत्येकी दोन गाड्या आहेत. त्याच पद्धतीने त्या कार्यरत असतात. त्यामुळे ज्याला हवी त्याने या सेवेचा लाभ घ्यायला हवा' अशी भूमिका त्यांनी मांडली.

थोडक्यात, गाड्या एक असोत किंवा दोन, मुंबई स्वच्छ आणि सुंदर व्हायला हवी एवढीच काय ती सामान्य मुंबईकरांची अपेक्षा आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा