या चिमण्यांनो !

मुलुंड - ऐन उन्हाळ्यात चिऊताईला घरटं मिळावं यासाठी 'स्पॅरो डे' चं औचित्य साधून 'अभिजित चव्हाण प्रतिष्ठान'ने मुलुंड परिसरात झाडांवर चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी लावली आहेत. साधारण 100 घरटी लावण्याचं उद्दिष्ट समोर ठेऊन ही मोहीम त्यांनी सुरू केली. तसेच या कडक उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी आणि थोडा खाऊ ठेवण्याचेही आवाहन अभिजित चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनी केलंय.

Loading Comments