मुंबई लाइव्हचा दणका

 Churchgate
मुंबई लाइव्हचा दणका
मुंबई लाइव्हचा दणका
See all

चर्चगेट - गेले दोन महिने चर्चगेट स्थानकात बंद असलेली बॉटल रिसायकल मशीन गुरुवारपासून सुरु करण्यात आलीय. यासंदर्भात मुंबई लाईव्हनं बातमी दाखवली होती. अखेर मुंबई लाइव्हची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनानं बॉटल रिसायकल मशीन सुरू केलीय. "या मशीनचा फायदा मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी होईल. त्यामुळे मशीन सुरू झाल्याचा आनंद आहे," असं प्रवासी राजेश गावकर यांनी सांगितलं.

"मशीनमध्ये कोणताही बिघाड नव्हता, फक्त त्यात कूपनची सुविधा नसल्यामुळे काही काळ मशीन बंद ठेवण्यात आली होती. येत्या नोव्हेंबरपासून मशीनमध्ये कुपनची सुविधा सुरू होणाराय. या मशीनमध्ये रिकामी पाण्याची बाटली टाकल्यास त्यातून प्रवाशांना एक कूपन मिळणार आहे. या कुपनचा फायदा त्यांना नवनीत बुक स्टोर्स, सहकार भंडार, पिझ्झा स्टोर्स, 10% सवलत मिळण्यासाठी होणार आहे," अशी माहिती चर्चगेट स्थानकातील वॉटर बॉटल मशीन ऑपरेटर बबन जाधव-पवार यांनी मुंबई लाइव्हला दिली.

Loading Comments