Advertisement

आरेतून पकडलेल्या मादी बिबट्याला लवकरच जंगलात सोडलं जाणार

येत्या काही दिवसांत रेडिओ-कॉलर मादी बिबट्या C33 ला परत जंगलात सोडेल.

आरेतून पकडलेल्या मादी बिबट्याला लवकरच जंगलात सोडलं जाणार
SHARES

जर सर्व काही नियोजनानुसार झाले, तर महाराष्ट्र वन विभाग येत्या काही दिवसांत रेडिओ-कॉलर मादी बिबट्या C33 ला परत जंगलात सोडेल. C33, सुमारे दोन वर्षे वयाची मादी बिबट्या, आरे मिल्क कॉलनी इथं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकली होती.

"वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ बिलाल हबीब रेडिओ कॉलर आणि वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी-इंडियाच्या डॉ. विद्या अथ्रेया म्हणाल्या की, आमची टीम यावर लक्ष ठेवून असेल. आमच्या टीमनं आधीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) मध्ये दोन बिबट्यांना रेडिओ कॉलर लावलं होतं.

तर बिबट्या C33च्या पोस्ट कॉलरिंगवर लक्ष ठेवण्यात येणार आहे," असं प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) - वन्यजीव सुनील लिमये यांनी सांगितलं.

मादी बिबट्या C33 ही बिबट्या C32 ची भावंड आहे. जी आरे दूध वसाहतीमध्ये नुकत्याच झालेल्या मानव-प्राणी संघर्षासाठी जबाबदार आहे. ज्यात गेल्या दोन महिन्यांत नऊ लोक जखमी झाले आहेत. वन विभागाच्या सूत्रांनी मिड-डेला सांगितलं की, रेडिओ कॉलर अहमदनगर जिल्ह्यातील जुन्नर इथून लवकरच मुंबईत पोहोचेल.

लिमये म्हणाले, "बिबट्याला रेडिओ कॉलर लावून तीला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची योजना आहे. संशोधक केवळ रेडिओ कॉलरचा वापर करून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणार नाहीत तर तो ज्या भागातून सोडला जाईल त्या परिसरात कॅमेरा ट्रॅप्स देखील बसवेल.

१ ऑक्टोबरला, C33 मादी बिबट्याला आरे मिल्क कॉलनी इथं पकडण्यात आलं. त्यानंतर तीला SGNP इथं पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे.



हेही वाचा

आता बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य

महाराष्ट्र : २०२०मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, ५ वर्षांतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा