Advertisement

आता बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य

पकडलेल्या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आत पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे.

आता बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य
SHARES

बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीनं, संध्याकाळ झाल्यावर आरे कॉलनीत शांतता पसरते. वस्तीतील रहिवाशांना संध्याकाळ होताच त्यांच्या घरात राहावं लागतं. लोकांचा विश्वास बसत नाही की बिबट्या पकडला गेला आहे.

गेल्याच आठवड्यात आरे मिल्क कॉलनीच्या आत पिंजऱ्यात एक बिबट्या पकडला गेला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रेडिओ कॉलर लावून पकडलेल्या प्राण्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या मते, आरे दूध वसाहतीतील सर्व बिबट्यांना रेडिओ कॉलर उपकरणांनी सुसज्ज करण्याची योजना आहे. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी पकडलेल्या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आत पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे.

त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. परंतु हे निश्चितपणे सांगता येत नाही की, हा तोच बिबट्या आहे ज्यानं १५ दिवसात ७ हून अधिक लोकांना ठार केलं. बिबट्याचा हल्ला थांबवण्यासाठी आणि लोकांवर हल्ला करणारा बिबट्या शोधण्यासाठी एसजीएनपीच्या टीम अजूनही रात्री मानवी वस्तीत गस्त घालतात.

उल्लेखनीय आहे की, गेल्या आठवड्यात आरे पोलिसांतर्गत निर्मला सिंह (55) आणि आयुष यादव (4) यांच्यासह एकूण ७ लोकांवर बिबट्यानं हल्ला केला होता. त्यानंतर आरे प्रशासन, वन विभाग आणि झोन १२ पोलिसांनी प्रयत्न केले. आतापर्यंत या परिसरात सुमारे एक डझन पिंजरे बसवण्यात आले आहेत, ज्यात सुमारे २ वर्षांचा एक बिबट्याही पकडला गेला होता.



हेही वाचा

दिलासादायक! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुंबईला धोका नाही!

'माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी'; पुर्ण लसीकरण झालेल्या सोसायट्यांच्या गेटवर लागणार भित्तीपत्रक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा