Advertisement

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये पावसाची हजेरी

शनिवारी रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये पावसाची हजेरी
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. 

मुंबईत पावसाची शक्यता हवामन विभागाने वर्तवली होती. त्यानुसार शनिवारी रात्री दादर, माटुंगा, लालबाग, परळ, वडाळा यांसह अनेक भागांत पाऊस पडला.

माटुंग्याच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरील ओल्या डांबराच्या पृष्ठभागावर मोटारसायकलस्वार घसरण्याच्या काही घटना घडल्या, पोलिसांनी सांगितले. शेजारील नवी मुंबई शहरात विजांचा लखलखाट पाहायला मिळाला मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस पडला नाही.

सर्वात उष्ण उन्हाळ्याचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राच्या राजधानीत गुरुवारपासून ढगाळ वातावरण होते.

हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएमडीने चार आठवड्यांचा मान्सून पावसाच्या आगमनाचा चार्ट जारी केला आहे, त्यानुसार मुंबई आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील इतर भागात ३ ते ९ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होईल. केरळमधील मान्सूनच्या आगमनाआधारे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २ दिवसांआधी हे ट्विट त्यांनी केले होते. 

मुंबई आणि इतर पश्चिम किनारपट्टी भागांमध्ये मान्सूनपूर्व सरींच्या आगमनानुसार ३ जून किंवा त्यानंतर हा पाऊस हळूहळू पश्चिम किनार्‍याकडे जाण्याची अपेक्षा आहे. या पावसाची तीव्रता १० ते १६ जूनपर्यंत वाढेल, ज्यामुळे मुंबई आणि देशातील बहुतांश भाग मान्सूनमध्ये दाखल होतील.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा