Advertisement

मुंबई : गणेश चतुर्थीच्या काळात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. 19 सप्टेंबरला गणपतीचे आगमन होणार आहे.

मुंबई : गणेश चतुर्थीच्या काळात मुसळधार पावसाची शक्यता
SHARES

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईतील पावसाचा जोर येत्या काही दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान पावसाचा जोर वाढू शकतो, असे संकेत भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मुंबईत पुढील तीन ते चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 14-15 सप्टेंबर दरम्यान कमी दाबाची पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे16 सप्टेंबरनंतर मुसळधार पाऊस पडू शकतो.

गेल्या आठवड्यात मुंबईसह रायगड, पालघर आणि ठाणे या शेजारील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. 7 सप्टेंबर रोजीही शहरात तीन अंकी पावसाची नोंद करण्यात आली होती, जी या वर्षी जुलैनंतर पहिलीच होती.

IMD च्या आकडेवारीनुसार, सांताक्रूझ वेधशाळेत 2 मिमी पावसाची नोंद झाली, तर कुलाबा वेधशाळेत गेल्या 24 तासात 5 मिमी पावसाची नोंद झाली.

मुंबईतील सातही तलावांमध्ये ९६.७९ टक्के पाणीसाठा

रविवारपर्यंत मुंबईतील सातही तलावांमध्ये ९६.७९ टक्के पाणीसाठा होता. सध्या, तुळशी, वेहार आणि मोडक सागर तलाव पूर्ण क्षमतेने (100%), तानसा 99%, भातसा 98%, मध्य वैतरणा 97% आणि अप्पर वैतरणा 88% आहेत.



हेही वाचा

मुंबई : बीएमसी शाळांमध्ये नाईट क्लासेसना सुरुवात

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा