लालबागमधला मळा

लालबाग - नांगराला जुंपलेले बैल, विहीर आणि घाम गाळणारा बळीराजा... खेड्या-पाड्यांत आजही हे दृश्य दिसेल. पण चक्क मुंबईत, तेही लालबागमध्ये असाच एक शेतमळा आहे... खरं नाही वाटत? अहो पण हे खरंच आहे... लालबागमध्ये आजही 2 एकरमध्ये प्रकाश गेडिया शेती करतायत आणि तेही नोकरी सांभाळून.

ही शेती पिकवण्यासाठी गेडियांनी स्वतः विहीर खणली. शेतीसीठी ते याच विहीरीचं पाणी वापरतायत. या मळ्यातला शेतमाल स्थानिक बाजारपेठेतच विकला जातो.गावाला गेल्याचा फील हवा असेल, शेती कशी करतात हे मुलांना दाखवायचं असेल तर या शेतमळ्यात तुम्हीही एक चक्कर नक्की टाकून या...

 

 

Loading Comments