Advertisement

महाराष्ट्राला पुन्हा चक्रिवादळाचा धोका, IMD कडून अतिवृष्टीचा इशारा

संबंधित चक्रीवादळाचं नामकरण 'जवाद' (Cyclone Jawad) असं करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राला पुन्हा चक्रिवादळाचा धोका, IMD कडून अतिवृष्टीचा इशारा
SHARES

पुन्हा एकदा अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

संबंधित चक्रीवादळाचं नामकरण 'जवाद' (Cyclone Jawad) असं करण्यात आलं आहे. हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळ किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं आहे. त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवसांत या हवेच्या कमी दाब्याच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाची दिशा पूर्वेकडे असून हे बंगालच्या उपसागराकडे सरकणार आहे. याचा परिणाम पुढील आठवड्यात १६ ते १७ ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर होणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील दोन ते तीन तासांत पुण्यासह मुंबई, पालघर, ठाणे, कोकण आणि घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत. दरम्यान वेगवान वारे देखील वाहणार आहेत, त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


हेही वाचा

तेजस ठाकरेंचं संशोधन, मुंबईतल्या विहिरीत आढळली अंध माशाची प्रजाती

मुसळधार पावसामुळे अंबरनाथमध्ये उद्यानाची भिंत कोसळली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा