Advertisement

तेजस ठाकरेंचं संशोधन, मुंबईतल्या विहिरीत आढळली अंध माशाची प्रजाती

तेजस यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली आहे. नवीन प्रजाती एक 'hypogean freshwater eel' आहे.

तेजस ठाकरेंचं संशोधन, मुंबईतल्या विहिरीत आढळली अंध माशाची प्रजाती
SHARES

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांचे पुत्र तेजस ठाकरे (tejas Thackeray) यांनी एक अंध माश्याच्या (new species of balm fish) नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. मुंबईतील विहीरींमध्ये 'ईल' माशाची नवी रक्तवर्णीय प्रजाती तेजस ठाकरे यांना आढळून आली.

तेजस यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली आहे. नवीन प्रजाती एक 'hypogean freshwater eel' आहे. तेजस ठाकरे ,प्रवीणराज जयसीम्हान आणि अनिल मोहोपात्रा यांच्या टीम ने हे संशोधन केलं आहे. ही प्रजाती अंध (Blind Eel) असून 'रक्थमिच्थिस मुंबा' (Rakthamichtys Mumba) असं या प्रजातीचं नामकरण केलं आहे.

तेजस ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये म्हटलं की, मला असं वाटतं की हा माझा आतापर्यंतचं सर्वोत्तम संशोधन आहे. अंध हायपोजीन गोड्या पाण्याची ईल ती सुद्धा मुंबईत. त्याला रक्थमिच्थिस मुंबा असं नाव देण्यात आलं आहे, जे मुंबईपासून प्रेरित आहे.

तेजस ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, काही वर्षांपूर्वी आम्ही ही नवीन प्रजातीचा शोध घेतला होता. आम्ही कोरोनाच्या काळात त्यावर काम केलं आणि आता आम्ही ते जगासमोर आणलं आहे.

महाराष्ट्र आणि उत्तर पश्चिम घाटातून वर्णन केलेली ही पहिली पूर्णपणे अंध भूगर्भातील गोड्या पाण्यातील माशांची प्रजाती आहे. ही पहिली अंध गोड्या पाण्यातील माशांची प्रजाती आहे, जी पश्चिम भागात आढळली आहे. 'Aqua International Journal of Ichthyology' मध्ये याबाबत एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशननं पर आणि शेपूट नसलेल्या एका नव्या दुर्मिळ माश्याची प्रजातीचं संशोधन केलं.

तेजस ठाकरे यांनी घोषित केलं की, मुंबा' या प्रजातीचं नाव मुंबई शहराचं अस्तित्व सूचित करतं. 'मुंबा' या शब्दाचे मूळ मराठी भाषेतून आले आहे. या शहरातील रहिवाशांनी पूजलेली मुंबा आई या देवतेचा सन्मान करते. या शब्दाचा आदर म्हणून या नवीन प्रजातीचे नामकरण मुंबा असं करण्यात आलं.

काही दिवसांपूर्वी मेघालयातील खासी टेकड्यांतून (Khansi hills, meghalaya) तेजस ठाकरे यांच्या टीमने अत्यंत सुंदर आणि तितकाच दुर्मीळ असलेला चन्ना स्नेकहेड हा मासा शोधला आहे. चन्ना स्नेकहेड या माशाच्या प्रजातीला ऑरिस्टॉन एम. रेंडॉन्गसंगी यांचं नाव देणार असल्याचंही तेजस यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय.

त्याआधी तेजस यांनी महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेतून स्चिस्तुरा हिरण्यकशी नावाची माशाची दुर्मिळ प्रजात शोधली होती. आजवर त्यांनी एकूण ११ दुर्मीळ वन्य प्रजातींचा शोध लावला आहे. यापूर्वी त्यांनी आणि त्यांच्या टीमनं पालीच्या प्रजातीचा देखील शोध लावला आहे.



हेही वाचा

तेजस ठाकरे यांचं नवीन संशोधन, माशाच्या प्रजातीचा लावला शोध

तेजस ठाकरे यांनी लावला चौथ्या नवीन प्रजातीच्या माश्याचा शोध

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा