Advertisement

तेजस ठाकरे यांनी लावला चौथ्या नवीन प्रजातीच्या माश्याचा शोध

सोनेरी रंगाचे केस असणारा माश्याची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी अंबोली घाटातील हिरण्यकश नदीत शोधली आहे.

तेजस ठाकरे यांनी लावला चौथ्या नवीन प्रजातीच्या माश्याचा शोध
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात माशाची चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे. सोनेरी रंगाचे केस असणारा माश्याची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी अंबोली घाटातील हिरण्यकश नदीत शोधली आहे.

या माश्याची ही २० वी प्रजाती असून तेजस ठाकरे यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे. त्यांनी या आधी सह्याद्रीच्याच पर्वत रांगात पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या होत्या.

आता हिरण्यकश नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचे नाव ‘हिरण्यकेशी’ असं ठेवण्यात आलं आहे. सोनेरी रंगाचे केस असणारा असा याचा संस्कृत अर्थ आहे. तेजस ठाकरे यांना माश्याच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि रिसर्च पेपरचे प्रमुख डॉ. प्रवीणराज जयसिन्हा यांचं सहकार्य मिळालं.

यापूर्वी तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला आहे. तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकरांच्या टीमनं पालींच्या (New Gecko Species) या दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. दुर्मिळ पालीचं नाव ‘मँग्निफिसंट डवार्फ गेको’ (Magnificent Dwarf Gecko) असं ठेवण्यात आलं आहे.

कर्नाटकातील सकलेशपूरच्या उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. भारतात वेगवेगळ्या पन्नास पालींच्या प्रजाती आढळतात. त्यात आता डोळ्यांच्या गोलाकार मोठ्या बुबळांच्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरीररचनेमुळे प्राणीतज्ञांचं लक्ष वेधून घेत आहेत.

गेल्या ९ महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात तेजस ठाकरेंनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ (Snake Boiga Thackeray) असं ठेवण्यात आलं होतं.हेही वाचा

तेजस ठाकरे यांच्या सह ४ तरुणांनी लावला नव्या पालीच्या प्रजातीचा शोध

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा